Friday, May 3, 2024
Homeब्लॉगआव्हाने बिकट

आव्हाने बिकट

सध्या जगात सर्वाधिक लोकसंख्या चीनची आहे. 2023 पर्यंत या टप्प्यावर भारत पोहोचण्याची शक्यता आहे. लोकसंख्या वाढल्याने शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होईल. शिक्षणाचा दर्जा ढासळेल आणि परिणामी अशिक्षित लोकांचे प्रमाण वाढत जाईल. लोकसंख्या वाढल्याने प्रतिव्यक्ती जमिनीचे प्रमाणही कमी होणार आहे आणि खानपानाचा स्तरदेखील ढासळत जाणार आहे. दुसरीकडे कमी जागेत, कोंदट भागात, दाट वस्तीत लोकांना राहण्याची वेळ येणार आहे. परिणामी आजारांचे प्रमाण वाढू शकते. दाट लोकसंख्येमुळे ओझोनचा थर आणखी पातळ होईल आणि त्वचेवर परिणाम होईल. परिणामी कर्करोगासारखा धोका वाढेल.

डॉ. अंशुमन कुमार, आरोग्यधोरण तज्ज्ञ

सध्या जगात सर्वाधिक लोकसंख्या चीनची आहे. मात्र आता चीनने लोकसंख्यावाढीवर नियंत्रण मिळवले आहे. 2023 पर्यंत या टप्प्यावर भारत पोहोचण्याची शक्यता आहे. लोकसंख्या वाढली असली तरी जमीन मात्र तेवढीच आहे. याउलट क्लायमेट चेंजमुळे ग्लेशियर वितळत असल्याने समुद्राची पातळी वाढत असून जमिनीचे क्षेत्रफळ कमी होत जाणार आहे. लोकसंख्या वाढल्याने प्रतिव्यक्ती जमिनीचे प्रमाणही कमी होणार आहे आणि खानपानाचा स्तरदेखील ढासळत जाणार आहे. कमी जागेत, कोंदट भागात, दाट वस्तीत लोकांना राहण्याची वेळ येणार आहे. परिणामी आजारांचे प्रमाण वाढू शकते. डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, क्षयरोग यांसारख्या आजारांचा फैलाव झाला आहे. यापुढील काळात अस्वच्छतेत आणखी भर पडत जाण्याची शक्यता आहे. लोकसंख्या आक्राळविक्राळ बनल्यास इच्छा असूनही काही करता येणार नाही. कारण झोपडपट्टीसारख्या भागात लोकांना नाईलाजाने राहावे लागेल. श्वसनविकाराचे प्रमाण वाढेल. दाट लोकसंख्येमुळे ओझोनचा थर आणखी पातळ होईल आणि त्वचेवर परिणाम होईल. परिणामी कर्करोगासारखा धोका वाढेल. सध्या त्याचा परिणाम केवळ गोर्‍या रंगावर होत आहे, कालांतराने सर्व रंगावर या अतिनील किरणांचा परिणाम होईल.

- Advertisement -

लोकसंख्या आणि शिक्षण या दोन्हींचा परस्परांशी असणारा संबंध लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढल्याने शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होईल. शिक्षणाचा दर्जा ढासळेल आणि परिणामी अशिक्षित लोकांचे प्रमाण वाढत जाईल. महत्त्वाचा भाग म्हणजे, शिक्षणाचे प्रमाण कमी होताच लोकसंख्या वाढण्यास हातभार लागेल. साहजिकच शिक्षणाबाबतची जागरुकता कमी होईल. त्यानंतर पुन्हा चक्र सुरू होईल. दुसरा दुष्परिणाम म्हणजे लोकांचे आरोग्य धोक्यात सापडेल. आरोग्य विज्ञान, शास्त्रज्ञ हे सातत्याने एखाद्या आजारांचे उच्चाटन करण्यासाठी काम करत असतात. त्याचवेळी दुसरा, तिसरा आजार बळावला तर आरोग्य यंत्रणा गडबडून जाईल. एक अँटिबायोटिक तयार करण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा काळ लागतो. उदा. करोनाकाळात नवनवीन व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला आणि त्यावर नियंत्रण आणता आणता आरोग्य यंत्रणांच्या नाकीनऊ आले. बहुतांश देशांच्या आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्या. मग विकसित, विकसनशील देश असो किंवा गरीब देश असो, सर्वांनाच करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फटका बसला.

बालमाता मृत्यूदर हा ग्रामीण भागात अजूनही अधिक आहे. ग्रामीण भागात आणि तळागळात पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नसल्याने अशक्त मूल जन्माला येणे किंवा अघटित घटना घडत असतात. गावात काही भागात आजही बाळंतपण असुरक्षित मार्गाने म्हणजे सुईणीच्या मदतीने करतात. लोकसंख्या वाढत असेल तर त्याच्या दरातदेखील वाढ होईल. कुपोषणामुळेदेखील मृत्यू होतात. लोकसंख्या वाढेल तर कुपोषणही वाढणार.

आजच्या स्थितीत जगभरातील शास्त्रज्ञांनी आपापल्या पातळीवर पाण्यातून अन्ननिर्मितीचे स्रोत शोधण्याचे काम सुरू करणे गरजेचे आहे. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे अगोदरच लँड रिसोर्सेसने खाद्यान्न मिळण्याचे प्रमाण कमी राहिले आहे. अशावेळी आगामी काळात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर सुमारे 70 टक्के पाण्याचा भाग आहे. अशावेळी आपण पाण्यातील अन्नस्रोत शोधल्यास तो एक चांगला पर्याय ठरेल आणि मोठ्या लोकसंख्येची खाद्यपुरवठ्याची चिंता मिटेल. अन्यथा पोषणाअभावी आगामी काळात हाडांचे विकार, स्नायूंचे विकारदेखील वाढू शकतात.

वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणार्‍या समस्येला कसे रोखायचे यावर आतापासूनच विचार करायला हवा. सर्वप्रथम स्रोतांचे योग्यरीतीने नियोजन करायला हवे. संसर्गजन्य आजारांना पायबंद घालण्यासाठी काम करायला हवे. लोकसंख्या वाढली तर कचरा, सांडपाणी याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती सुविधा आहे, डास वाढणार नाहीत यासाठी काय करायला हवे, या गोष्टींवर विचार केला पाहिजे. मलेरिया, डेंग्यूचा फैलाव होणार नाही, यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी, याचाही सर्वंकष विचार झाला आहे. वैद्यकीय शास्त्रांत सुधारणा झाल्याने वयोमान किंवा जगण्याचे वय वाढले आहे. येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार आहे. ही लोकसंख्या ‘प्रॉडक्टिव्ह’ मानली जात नाही. कारण वृद्ध नागरिक हे कुशल मनुष्यबळ नसतात. उलटपक्षी त्यांच्या आरोग्यासाठीच्या सुविधांसाठी शासनाला आरोग्यसेवेवरील खर्च वाढवावा लागतो. येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांत हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. साहजिकच आरोग्यसेवेबरोबरच आर्थिक ताणदेखील वाढेल. म्हणूनच आतापासूनच त्यादृष्टीने तयारी करणे गरजेचे आहे. अशा स्थितीला कसे हाताळता येईल, यावर विचार करायला हवा.

करोनासारख्या महासाथीनंतर आता पुन्हा एखादा संसर्ग येत असेल किंबहुना येणारच आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी काय सुविधा आहेत, याचा विचार केला आहे का? कारण लोकसंख्यावाढीबरोबरच अशा प्रकारचा संसर्ग वेगाने पसरतो. कारण मानवी संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेचा पाया अधिक मजबूत करावा लागेल. लोक शिक्षित झाले तरच लोकसंख्या नियंत्रित राहील. त्याचवेळी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष द्यायला हवे. परिणामकारक उपचारासाठी नियोजन करायला हवे. आरोग्य तज्ज्ञांची टीम तयार करून लोकसंख्या, पर्यावरणावर काम करणार्‍या मंडळींबरोबर वेळोवेळी बैठक घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करायला हवा. वाढत्या लोकसंख्येवर अंकुश ठेवण्याबरोबरच चांगले शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावरही काम करायला हवे.

- Advertisment -

ताज्या बातम्या