Monday, May 6, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना आज जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, या तिघांना जामीन मिळल्यानंतर या तिघांच्या समर्थकांनी त्यांना हार घालत, ढोल ताशा वाजवत, नाचत आणि फुगडी खेळत जल्लोष केला.

- Advertisement -

मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे या तिघांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या ते सरकारवर अवलंबून राहिले नाही असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. त्यावरून चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाले होते, यामध्ये जीवे मारण्याचा कलम देखील लावण्याची तयारी झाली होती त्यात पत्रकार आणि पोलीस यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, झालेला विरोध बघता ती कारवाई मागे घेण्यात आली होती.

दरम्यान, शाइफेक केल्याप्रकरणी मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते. राजकीय दाबापोटी हे कलम लावण्यात आल्याचे आरोपीचे वकील सचिन भोसले यांनी म्हटलं होतं. विरोधकांनी भाजपावर टीका केल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (३०७) हे कलम कमी केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या