Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नर-शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, ३५ जखमी

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, ३५ जखमी

वावी | संतोष भोपी | Vavi

सिन्नर-शिर्डी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे…

- Advertisement -

सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक हॉटेल वनराईच्या जवळ बस क्रमांक MH 04 SK 2751 व मालवाहतूक ट्रक क्रमांक MH 48 T 1295 यांच्या समोरासमोर अपघात होऊन 11 मृत्युमुखी पडले आहेत,

तर ३५ जण गंभीर जखमी आहेत. ठाणे अंबरनाथ परिसरातून सदर बस शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना वावी पाथरे दरम्यान टोल नाक्याच्या पुढे एकेरी वाहतूक असल्याने हा अपघात समोरासमोर झाल्याचे समजते.

यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

जखमींना नाशिक, सिन्नर अशा ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. दरम्यान मृतांची नाव अद्याप पर्यंत समजू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या