Monday, May 6, 2024
Homeनगरगोंडेगाव सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमनसह तीन संचालकांना निलंबित करण्याची मागणी

गोंडेगाव सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमनसह तीन संचालकांना निलंबित करण्याची मागणी

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील गोंडेगाव विविध सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन, व्हा चेअरमनसह तीन संचालकांना पदावरून निलंबीत करावे, अशी मागणी गोंडेगाव सोसायटीचे विद्यमान संचालक नवनाथ गंगाधर फोपसे यांनी सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

सोसायटीचे सभासद नारायणराव सोपानराव फोपसे, कुंडलिक रायभान दिवटे, संजय जनार्दन कदम, अर्चना नवनाथ काळे व सुनीता राजेंद्र कदम यांच्या विरोधात फोपसे यांनी लेखी तक्रार केली आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद होण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावे शेती असणे आवश्यक आहे. परंतु उपरोक्त सभासदांनी त्यांचे नावे कुठल्याही प्रकाराची शेत जमीन नसताना देखील विविध विकास सोसायटी सभासद व संचालकपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता व त्याप्रमाणे ते सोसायटीत बिनविरोध निवडून देखील आले आहेत.

तसेच वेळोवेळी संस्थेचे झालेल्या मिटींग व बैठकांना हजेरी लावून कामकाजात सहभाग नोंदविला आहे. तसेच संचालक व्हा. चेअरमन कुंडलिक रायभान दिवटे व अरविंद उत्तमराव फोपसे यांची पत्नी अरुंधती अरविंद फोपसे यांचे विरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये कारवाई होवून व त्याप्रमाणे दंड निश्चितीची कारवाई देखील झालेली आहे. असे असताना कुंडलिक दिवटे व अरविंद फोपसे यांच्या नावे असलेले विकास संस्थेचे कलम 88 अन्वये असणारी दंडाची रक्कम आज रोजी पर्यंत न भरता थकित असल्याचे दिसून येत आहे.

त्याचप्रमाणे वेळोवेळी खोटी कागदपत्रे दाखवून अर्जदार व सरकारी यंत्रणेची घोर फसवणूक या संबंधितांनी केली आहे व भविष्यातही संबंधित संस्थेची फसवणूक करून संचालक मंडळ व विकास सोसायटीची बदनामी व नुकसान करू शकतात. दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांनी या सर्वांची चौकशी करून त्यांचेवर सरकारी यंत्रणेची व श्री. फोपसे (अर्जदार) यांची फसवणूक केली म्हणून कारवाई व त्यांचे सभासद व संचालकपद रद्द करावे, तसेच खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली म्हणून संबंधितावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नवनाथ फोपसे यांनी केली आहे.

राजकीय सुडोपोटी व त्यांच्या काही वैयक्तिक स्वार्थापोटी व पदासाठी त्या संबंधित व्यक्तीने तक्रार केली आहे. त्या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही जरी संबंधित अधिकार्‍यांच्या काही नोटिसा आल्या तर आम्ही सर्व संचालक कायदेशीर बाबींना समोरे जाऊ.

– नारायणराव फोपसे, चेअरमन, गोंडेगाव सोसायटी

आम्हाच्या कुंटुबातील व्यक्तीकडे कोणत्याही प्रकराची संबंधित संस्थेची मागील थकबाकी नाही. संबंधित व्यक्ती ही जाणूनबजून संस्थेची बदनामी करण्यासाठी वैयक्तिक द्वेषापोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारीला कायदेशिर कारवाईला सामोरे जाणण्यास तयार आहे.

– कुंडलिक दिवटे, व्हा. चेअरमन, गोंडेगाव सोसायटी

- Advertisment -

ताज्या बातम्या