नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान पहिल्या , दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत सत्यजित तांबे आघाडीवर आहेत.
मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून चौथ्या फेरीची मतमोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. तांबे यांना चौथ्या फेरी अखेर 60161 तर पाटील यांना 33776 मते मिळालेत. चौथ्या फेरीअखेर तांबे 26385 मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीचा निकाल पुढील प्रमाणे
सत्यजित सुधीर तांबे : 60161
शुभांगी भास्कर पाटील 33776
रतन कचरु बनसोडे :2297
सुरेश भिमराव पवार :649
अनिल शांताराम तेजा :83
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :223
अविनाश महादू माळी :1524
इरफान मो इसहाक :68
ईश्वर उखा पाटील :192
बाळासाहेब रामनाथ घोरपडे :617
जुबेर नासिर शेख:326
सुभाष राजाराम जंगले :240
नितीन नारायण सरोदे :223
पोपट सिताराम बनकर :75
सुभाष निवृत्ती चिंधे :142
संजय एकनाथ माळी :164
वैध मते :100760
अवैध मते :11240
एकूण :112000