Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगावात मध्यरात्री धाडसी दरोडा..!

जळगावात मध्यरात्री धाडसी दरोडा..!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील बजरंग बोगद्याजवळील ढाके नगरात मध्यरात्री दरोडेखोरांनी (robbers) हातात शस्त्र घेवून कुटूंबाला (family) धाक दाखवित घरातून 50 हजाराची रोकड, सोन्याची चैन आणि दुचाकी घेवून (robbery) पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मनपा आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्तीअन् फुले मार्केटमध्ये काढली गुन्हेगारांची धिंड

जळगाव शहरातील ढाके नगरात प्रमोद विठ्ठल घाडगे (वय-59) हे पत्नी व मुलासह राहतात. त्यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. मुलगा सुद्धा प्रमोद घाडगे यांच्यासोबत कुरिअरचाच व्यवसाय करतो. गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले. चाकू कुर्‍हाड तसेच लाकडी दांडका त्यांच्या हातात होते.

खालच्या खोलित झोपलेल्या प्रमोद घाडगे व त्यांच्या पत्नी या दोघांना दरोडेखोरांनी पैसे कुठे आहेत ? अशी विचारणा केली. तसेच घरात कोण कोण आहे, हे सुद्धा विचारले. घाडगे यांनी मुलगा वरच्या खोलीत झोपला आहे असे सांगितल्यावर तीन दरोडेखोर वरच्या खोलीत गेले व मुलाची कॉलर पकडून त्याला सुद्धा खाली घेऊन आले.

आयशर आणि कारच्या धडकेत एक ठार

यानंतर तिघांना खाली बसवीले. दरोडेखोर वरच्या खोलीत जावून कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी 50 हजाराची रोकड तसेच प्रमोद घाडगे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन काढली तसेच दरोडेखोरांनी घाडगे यांच्या दुचाकीची चावी घेत बाहेर अंगणातील दुचाकी घेत हातातील लाकडी दांडके फेकून देत पोबारा गेला.

या घटनेनंतर घाडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या