Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या... तर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं - संजय राऊत

… तर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं – संजय राऊत

मुंबई | Mumbai

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Savarkar) यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सावरकर यांच्या आठवणींना स्मरण करत बाळासाहेबांच्याही स्मृतींना उजाळा दिला. यावेळी राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले….

- Advertisement -

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

राऊत म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहे. त्यांच्या विचारांचं सरकार देशात आणि राज्यात असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो. वीर सावरकर हे महान क्रांतीकारी आहे. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहे. देशात क्रांतीची मशाल पेटवणारे महान क्रांतिकारक आहे. सावरकर हे बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) प्रेरणास्थान होते. सध्या देशात स्वत: च्या राजकारणासाठी वीर सावरकर यांचा देशात वारंवार अपमान करण्यात आला. अशा अपमान करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं आणि आम्ही सावरकरांच्या विचाराचे राज्यकर्ते आहोत हे सिद्ध करावे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

पुढे ते म्हणाले की, शिंदे गटाने मराठी भाषेला (Marathi language) अभिजात दर्जा द्यावा यासाठी ठराव केला आहे. आता केंद्रातही त्यांचे महाशक्ती सरकार आहे. मग ही महाशक्ती मराठीच्या बाबतीत हात आखडता का घेते. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर दिल्लीच आक्रमण सुरु असून हे दुर्दैवी असल्याचे राऊतांनी सांगितले. तसेच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना मराठी अस्मितेसाठी केली असेही राऊतांनी म्हटले.

द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू

ते पुढे म्हणाले की, ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि भाजपा (BJP) हेच खरे राम-श्याम आहेत. तसेच शिवसेना (Shivsena) आपल्या पायावर मजबूतीने उभी असून जे सोडून गेले त्यांची पर्वा नसल्याचे राऊत म्हणाले. याशिवाय जिथं भाजपला जिंकायचे असते तिथं ओवेसी जात असतात. त्यामुळे ओवेसी यांची पार्टी भाजपची बी टीम असल्याचे लोक म्हणत असतात असे राऊतांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या