Friday, May 3, 2024
Homeजळगावयू-ट्यूबवरून नकली नोटा तयार करणारा गजाआड

यू-ट्यूबवरून नकली नोटा तयार करणारा गजाआड

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

हमाली काम करता करता युट्यूबला (YouTube) एकाने बनावट नोटा बनविण्याचा व्हिडिओ पाहिला आणि घरातच नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. 50 हजारात दीड लाखाच्या नोटा देणार्‍या देविदास पुंडलिक आढाव (वय-31 रा.कुसुंबा) याला उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 68 हजार 900 रुपयांच्या 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्या असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बुधवारी चोपडा उपविभागीय कार्यालयातील पोलीस नाईक राहुल बैसाने यांना एक व्यक्ती बनावट नोटा छपाई करून विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. बैसाने यांनी याबाबत लागलीच जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना कळविले. गावीत यांनी लागलीच आपले विशेष पथक बोलाविले आणि कारवाईसाठी रवाना केले. पथकाने सापळा रचून घरातच नकली नोटा छपाई करणार्‍या देविदास पुंडलिक आढाव याला बोलाविले. पथक अगोदरच कुसुंबा परिसरात सापळा लावून बसलेले होते. पथकातील एका कर्मचार्‍याने संपर्क केल्यावर देविदास आढाव याने एका जागेवर नोटा खरेदीसाठी बोलाविले.

या पथकाची कामगिरी : ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलीस कर्मचारी महेश महाले, रविंद्र मोतीराया, निलेश पाटील, सचिन साळुंखे, सुहास पाटील, राहुल बैसाने, रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील यांच्या पथकाने केली.

रॅकेट असण्याची शक्यता

पथकाने देविदास आढाव यांच्याकडून 100, 200 आणि 500 च्या 1 लाख 68 हजार 900 रुपयांच्या नकली नोटा हस्तगत केल्या. तसेच त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले आहेत. आढाव याच्याकडून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या