Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांच्या जमिनी राज्य सरकार भाड्याने घेणार; फडणवीसांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांच्या जमिनी राज्य सरकार भाड्याने घेणार; फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे | Pune

सौरऊर्जा प्रकल्पासाठी (Solar Power Plant) शेतकऱ्यांच्या जमिनी (land) वापरल्या जाणार असून त्याबदल्यात शेतकऱ्यांना (Farmers) मोबदला दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले असता त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिली…

- Advertisement -

अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

यावेळी ते म्हणाले की, केमिकलच्या वापरामुळे काळ्या आईची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारत हळूहळू कॅन्सर कॅपटील होत आहे. कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आता आपल्याला नैसर्गिक शेतीकडे (Farm) यावं लागेल. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विषमुक्त शेतीली सुरुवात केली आहे. त्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. जवळपास यावर ३ हजार कोटी खर्च करण्यात येणार असून यामधून आपली उत्पदक्ता वाढेल असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

पुन्हा अवकाळीचे संकट; हवामान विभागाचा अंदाज

पुढे ते म्हणाले की, आता शेतकऱ्यांना (Farmers) दिवसाला बारा तास वीज पुरवठा करण्यासाठी वीज पुरवठा करणारे फिडर सोलरवर करण्याचे काम आपण हाती घेतं आहोत. शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ३० % फिडर आपण आता सोलरवर केले आहेत. सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती ३० वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. त्या जमिनीची मालकी शेतकऱ्याची राहणार असून १ एकरमागे वर्षाला ७५ हजार रुपये भाडं देण्यात येईल. इतकेच नव्हे तर दरवर्षी २ टक्क्यांनी वाढ करण्यात येईल, असेही फडणवीसांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या