Thursday, May 9, 2024
Homeनाशिकश्रीरामजन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

श्रीरामजन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

नवीन नाशिक । प्रतिनिधी

परिसरात विविध ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर अनेक ठिकाणी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने सर्वच ठिकाणी धार्मिक वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

पंचवटीतील राम जन्मोत्सव हा जगात प्रसिद्ध असला तरी, सर्वच भाविकांना प्रत्यक्ष तेथे जाऊन दर्शन करता येत नाही. त्यामुळे जवळपास असणार्‍या मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. नवीन नाशकात अनेक ठिकाणी प्रभू श्रीरामाची मंदिरे आहेत. उत्तमनगर येथील श्रीराम मंदिर हे नवसाला पावणारे असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने दरवर्षी हजारो भाविक दर्शनाला व नवस फेडायला येतात.

याही वर्षी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून सकाळी महाभिषेक, महापूजा, दुपारी श्रीराम जन्मोत्सव, सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री राम मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिभाऊ बच्छाव, शांताराम भामरे, प्रवीण गुरव, विश्वनाथ नेरकर, सचिन पाटील, बापूराव आहेर, सुभाष बडगुजर, श्रीराम मित्र मंडळ, युवा मित्र मंडळ व महिला मंडळ प्रयत्नशील आहेत.

नाशिकरोडला आज रथयात्रा

नाशिकरोड । येथील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने आज नाशिकरोड परिसरात भव्य रथयात्रा मिरवणुकाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामनवमी उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नाशिकरोड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सायंकाळी चार वाजेला भव्य रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामांच्या प्रतिमेने सजवलेल्या रथयात्राची सुरुवात मुक्तीधाम मंदिर येथून सुरू होऊन बिटको चौक, मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सत्कार चौक मार्गे अनुराधा चौक येथून मुक्तीधाम मंदिर येथे रथयात्रा चा समारोप होईल. यात्रेत अघोरी नृत्य, मर्दानी खेळ, व नाशिक येथील प्रसिद्ध रामनगरी वाद्य पथक सहभागी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या