Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामागासवर्गीयांच्या निधीला कात्री

मागासवर्गीयांच्या निधीला कात्री

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून लक्ष्य करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शुक्रवारी ट्विट करून केली.

- Advertisement -

BDOने लाच मागितली; युवा सरपंचाने नोटाच उधळल्या

सन २०२३-२४ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात, ‘स्टँड अप इंडिया’ (Stand Up India) योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून १० कोटी करण्यात आली आहे, या बाबींकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला असल्याचे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या