मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- Advertisement -
संबंधित दुर्घटना ही मांडवा येथे घडली आहे. मांडव्यात बोट जेटीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोटीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला अशी चर्चा आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली नाही.