Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ते मातोश्रीवर...

एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ते मातोश्रीवर…

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांनी (MLA) बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. त्यावेळी काही जणांनी शिवसेनेत (Shivsena) फूट भाजपमुळे तर काहींनी राष्ट्रवादीमुळे पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे…

- Advertisement -

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी यांनी दाखल केली तक्रार

हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी बंडाआधी ‘मातोश्री’वर नेमकं काय घडलं ते सांगताना बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असे मातोश्री निवासस्थानी येऊन सांगितले. त्यावेळी ते रडले सुद्धा होते. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच त्यांच्यासोबत गेलेले ४० आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी (Money) तिकडे गेल्याचे आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सांगितले.

सिटीलिंकची बससेवा सकाळपासून ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

पुढे ते म्हणाले की, “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकास खातं, आम्ही त्यांना देऊ केलं होते. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटले नव्हते ते पाठीमागून वार करतील. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही, ” असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या