Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनया अभिनेत्रीला कलाक्षेत्रासोबतच आहे राजकारणाची आवड

या अभिनेत्रीला कलाक्षेत्रासोबतच आहे राजकारणाची आवड

मुंबई| Mumbai

मराठी अभिनय श्रेत्रासोबत हिंदी अभिनय क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री (Actress) सायली संजीवने(Sayali Sanjiv) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावार मराठीतील अनेक मालिका चित्रपटांमधून तिच्या अभिनयाच कौशल्य वेळोवेळी सिध्द केल आहे.

- Advertisement -

कलाक्षेत्रासोबतच सायलीला राजकारणाची ही आवड आहे. तिने काही वर्षांपुर्वी मनसे पक्षात ही प्रवेश केला होता. मनसेमध्ये तिची मनसे चित्रपट कामगार सेनेच्या(MNS Chitrapat Kamgar Sena) उपाध्यक्षपदी निवड ही करण्यात आली आहे. मात्र आता तिने राजकारणात काम करण्याबाबत भाष्य केलं आहे.

सायलीने नुकतेच एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये टिप्पणी केल्यावर तुला ट्रोल केलं गेल या कडे तु कशी बघते? यावर सायलीने उत्तर दिल की, मी एका पक्षाची सदस्य आहे, मी एका पदावर आहे, त्यामुळे मला पक्षाची बाजू मांडणारच. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षावर जर टिका होत असेल तर मी ती स्विकारतेच. ही टिका स्विकारणं गरजेच आहे. एखाद्या पक्षाची विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार मांडावेच लागतात. त्यामुळे टिका होत जरी असली तरी मला त्याचा काही फरक पडत नाही.

मी त्या पक्षात आहे तर मी त्याचीच बाजू मांडणार. दुसऱ्या पक्षाचं एखादं काम आवडलं तर तेही मी सांगणार. पण बाजू मांडताना मी माझ्या पक्षाची मांडणार हे इतकं साधं गणित आहे. जे महाराष्ट्रासाठी, देशासाठी चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणण्याचीही आपल्यामध्ये वृत्ती असावी. पण त्यावरही टीका होते. कारण टीका करणारे एवढा वेळ माझ्यासाठी देत आहेत, माझ्याबाबत बोलत आहेत याचा मला आनंद आहे.

मात्र भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का? असाही प्रश्न सायलीला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, माहीत नाही. असेलही, मला नक्कीच मला काम करायला आवडेल. सायली ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाबरोबर तिला यापुढेही नगरसेवक, आमदार, खासदार या पदासाठी काम करायची इच्छा आहे हे दिसून आलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या