Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात मनसेला मोठा धक्का! दिलीप दातीर यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

नाशकात मनसेला मोठा धक्का! दिलीप दातीर यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक | Nashik

राज्यात भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे दररोज विरोधी पक्षांना खिंडार पडत आहे. अशातच आता नाशिकमध्ये (Nashik) मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

Nashik : विहिरीचा बार उडविताना भीषण दुर्घटना; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir) यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या संबंधीचे पत्र त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठवले असून आपल्याला पद मुक्त करावे अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच पदाला न्याय देता येत नसल्याने राजीनामा (Resignation) देत असल्याचे दातीर यांनी म्हटले आहे.

खारघर दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दरम्यान, दिलीप दातीर यांनी शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक असताना राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता. तसेच २०१९ मध्ये मनसेच्या तिकिटावर पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक (Election) लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या