Friday, May 3, 2024
Homeनाशिकविक्रम हाजरांच्या स्वरांनी गोदकाठ निनादला

विक्रम हाजरांच्या स्वरांनी गोदकाठ निनादला

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक वसंत व्याख्यानमालेचा काल शानदार शुभारंभ झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक विक्रम हाजरा यांच्या सुरस्वरांनी गोदाघाट निनादला होता. भारताच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ हाजरा यांच्या भक्ती संध्या या कार्यक्रमाने झाला.

- Advertisement -

गोदाघाटावरील देवामामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट येथे या व्याख्यानमालेत ३१ मे पर्यंत दररोज देश-विदेशातील नामांकित वक्ते आपले विचार मांडणार आहेत. या व्याख्यानमालेच्या शुभारंभ कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष उद्योगपती आणि देशदूतचे संस्थापक देवकिसनजी सारडा, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. एम. एस. गोसावी तसेच इतर अध्यक्षांचे वारस यांचा सत्कार करण्यात आला.

शताब्दी वर्षानिमित्त यशवंत महाराज पटांगणावर व्याख्यानमालेने ७० फूट लांबीचे भव्य व्यासपीठ उभारले आहे. तसेच पटांगणावर आनंद ढाकीफळे यांच्या संकल्पनेतून अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे.

दरम्यान, या भव्य व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रारंभी माई लेले, नेमिनाथ जैन शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत सादर केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी तर संदीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या