Friday, May 3, 2024
Homeनगरसंघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, वाचा...

संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, वाचा सविस्तर

बोधगाव | प्रतिनिधी | बाळासाहेब खेडकर

संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

असा आहे निवडणुक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे १५ मे ते १९ मे, २२ मे रोजी छाननी, २३ मे रोजी अर्ज मागे घेणे, ७ जून चिन्ह वाटप, दि, १८ जुन मतदान तर दि १९ जुन रोजी मतमोजणी

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

१९ जागेसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर

बोधेगाव गट २, हातगाव ३, मुंगी ३, चापडगाव ३, हसनापुर २, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था १, अनुसूचित जाती, अनु जमाती, प्रतिनीधी १, महिला प्रतिनिधी २, इतर मागासवर्ग १, भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागासप्रवर्गातील १, अश्या संचालक मंडळाच्या एकूण १९ जागेसाठी हा निवडणुक कार्यक्रम जाहिर केला आहे

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकिय हालचालींना वेग येणार आहे. सध्या हा कारखाना राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे यांच्या ताब्यात असून विरोधी भाजपा आ मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे काय भूमीका घेवुन निवडणुकीची रणनिती आखतात याकडे लक्ष लागले आहे.

नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, दोघा झेडपी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचे पिताश्री संस्थापक संचालक असल्याने राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे यांच्या विरोधात भाजपाचे पॅनल करणार का असा सवाल व्यक्त होत असुन प्रतापराव ढाकणे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देणार का विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देणार याची राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. माञ भाकरी फिरवण्याची मोठी गरज असल्याचं सभासदातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या