Friday, May 3, 2024
Homeजळगावमार्केटच्या जागा विक्री होऊ नये यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे-आ.किशोर पाटील

मार्केटच्या जागा विक्री होऊ नये यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे-आ.किशोर पाटील

पाचोरा – प्रतिनिधी pachora

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणूकित (Election) मतदारांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना १५ पैकी ९ जागेंवर निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार. निवडणूक प्रचारात आम्ही मतदारांना-शेतकरी, व्यापारी यांना जी आश्वासने आणि वचनं दिली ती १०० टक्के पूर्ण करण्याचे काम आमचे सभापती आणि उपसभापती करणार आहे.

- Advertisement -

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजपचा झेंडा

बाजार समितीत शेतकरी, व्यापारी हितांचेच निर्णय घेतले जातील कोणतीही चुकीची कामे आम्ही करणात नाही. विशेष म्हणजे सभापती पदाची निवडणूक चुरशीची होणार अशी उत्सूकता सर्वांना होती.परंतु महाविकास आघाडी कडे संख्या बळ नसल्याने त्यांनी सभापती पदाची निवडणूक न लढविता काढता पाय घेतला तर, स्वतंत्र भाजप गटाचे दोन संचालक गैरहजर राहिल्याने आपसूकच ही निवडणूक बिनविरोध झाली.यदाकदाचित चुरस झाली असती तरी सभापती शिवसेना-भाजपचाच झाला असता.

विरोधकांनी बाजार समितीच्या जनहितांच्या कामांसाठी दिलेल्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. परंतु पत्रकार परिषदेत माझेवर जे काही आरोप केले ते मान्य नाहीत. उलट भविष्यात विरोधकांनी भाजीपाला यार्डची जागा विक्री होऊ नये यासाठी आणि वेळोवेळी शेतकरी, व्यापारी हितांचे जे काही निर्णय होतील त्या-त्या वेळी आम्हाला सहकार्य करावे.

आमदारांकडून सत्तेचा दुरुपयोग-वैशाली सुर्यवंशी

बाजार समितीच्या कोणत्याही जागा विक्री होणार नाहीत आणि चुकीची कामे देखील होणार नसल्याची ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी नवनियुक्त सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए.पाटील, सर्व संचालकसह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या