Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रगोदावरी नदीकाठी प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

गोदावरी नदीकाठी प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

नांदेड | Nanded

गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गोदावरी नदी (Godavari River) काठावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. विकास धोंडिबा तुपेकर (२२) आणि ऋतुजा बालाजी गजले (१८) असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत विकास तुपेकर आणि ऋतुजा गजले हे दोन्ही मुगट गावातीलच रहिवाशी आहेत. दोघांचे घर एकमेकांसमोर आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाची कुणकुण कुटुंबीयांना लागली होती. याच विषयावरून अनेकवेळा वाद होऊन विकासला मारहाण करण्यात आली होती.

श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे…

मात्र, दोघांमधील प्रेमसंबंध सुरूच होते. पाच दिवसांपूर्वी हे प्रेमीयुगुल अचानक बेपत्ता झाले होते. अखेर २३ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह (Crime News) गावातील गोदावरी नदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गौतमीचं आडनाव पाटील नव्हे तर…; पुन्हा नव्या वादाला फुटलं तोंड

या दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या