Friday, May 3, 2024
Homeनगरएमआयआरसीमधील 16 लाखांच्या साहित्याची चोरी

एमआयआरसीमधील 16 लाखांच्या साहित्याची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील सोलापूर रोडवरील एमआयआरसीमधील बिल्डींग बांधकामाचे 16 लाख तीन हजार 651 रुपये किमतीचे साहित्य दोघांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुभेदार नुद इस्लाम अब्दुल वाहब (वय 41) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 13 जून रोजी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राधा कलगुडे व संतोष खरात (दोघे रा. दरेवाडी ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी ते 6 जून दरम्यान ही घटना घडली आहे. आर्मी विभागातील एमआयआरसीच्या गेट नंबर दोन ए जवळील बिल्डींग नंबर 30 आएमटी या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विविध कंपनीचे 16 लाख तीन हजार 651 रुपये किमतीचे साहित्य आणले होते.

दरम्यान, सदर इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार काम सोडून गेल्याने ते साहित्य 3 फेब्रुवारी रोजी एका रुममध्ये सील करून ठेवले होते. त्या रुमचा कडीकोयंडा तोडून सदरचे साहित्य चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या