Monday, May 6, 2024
Homeनगरआता बैलांचे वेदनामुक्त खच्चीकरण!

आता बैलांचे वेदनामुक्त खच्चीकरण!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रीय पातळीवरी अनिमल राहत स्वयंसेवी संस्था यांचा पुढाकार आणि पशूसंवर्धन विभाग यांच्या संयुक्तविद्यामाने यापुढे बैलांचे वेदनाविरहित खच्चीकरण हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मानवाप्रमाणे बैलांना जमिनीवर झोपवून त्यांना वेदनाशामक औषध देत भूल देवून त्यांचे खच्चीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, नगर जिल्ह्यात वर्षभरात पशूसंवर्धन विभागाच्यावतीने 28 हजार बैलांचे खच्चीकरण करण्यात आले असून यापुढे परंपारिक पध्दतीऐवजी नवीन पध्दतीने भूल देवून खच्चीकरण करण्यात येणार आहे.

जनावरांसाठी काम करणारी अनिमल राहत संस्था आणि पशुसंवर्धन विभाग राज्य सरकार-जिल्हा परिषद पूशसंवर्धन विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने दोन दिवसांपूर्वी जनावरांच्या वेदनाविरहित खच्चीकरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसह राज्यात यापूर्वी जनावरांचे खच्चीकरण करण्यासाठी बैलांना जबरदस्तीने जमिनीवर पाडून बर्डीझो कॅस्ट्रेटरच्या (चिमट्याच्या) सहाय्याने अंडाशयाला चिमटा देवून लहान करण्यात येते होते. यामुळे बैलाचे अंडाशयातील शुक्रवाहिनी जवळपास बंद होवून अंडाशायला रक्त पुरवठा करणारी वाहिनी आणि मंजातंतू यांचे कार्य मंदावते. एका प्रकारे बैलामध्ये करण्यात येणारी प्रक्रिया ही वेदनादायी आहे. यात भुलीचा वापर करण्यात येत नसल्याने बैलांना मोठ्या प्रमाणात वेदना होत होती. बैलाच्या खच्चीकरणाची प्रक्रिया वेदनाविरहित कण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील ‘राहत’ या जनावरांसाठी कार्य करणार्‍या संस्थेने पुढकार घेतला आहे.

यासाठी जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकांना (जनावरांचे डॉक्टर) नुकतचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकुंद राजळे आणि पशूधन विकास अधिकारी डॉ. अशोक ठवाळ यांच्यासह जिल्ह्यातील 85 पशुधन विकास अधिकारी व तालुका लघु पशु चिकित्सालयाचे सहा सहाय्यक जनावरांचे डॉक्टर उपस्थित होते.

नगरप्रमाणे आता बैलांचे वेदनाविरहित खच्चीकरण प्रशिक्षण शिबिर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, जळगाव, उस्मानाबाद, बीड, लातूर, औरंगाबाद, जालना, परभणी, सिंधुदुर्ग, अकोला जिल्ह्यात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, गायीसह कुत्रे, मांजर या प्राण्यांमध्ये नैसर्गिक संयोग टाळण्यासाठी आणि चांगल्या प्रजातीच्या कुत्रित रेतनासाठी बैलांचे खचिकरण करण्यात येते. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 28 हजार बैलांचे खच्चीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाने दिली.

बैलांचे खच्चीकरण पूर्वीप्रमाणे चिमट्याच्या सहाय्याने केल्यास ते बैलांसाठी वेदनादायक आहे. यासाठी पशूसंवर्धन विभाग आणि अ‍ॅनिमल राहत संस्थेच्यावतीने यापुढे वेदनामुक्त खच्चीकरण करण्यात येणार असल्याचे राहत या संस्थेचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. नरेश उप्रेती यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या