Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक : 'अवयवदान जागरूकता' या विषयावर व्याख्यान संपन्न

नाशिक : ‘अवयवदान जागरूकता’ या विषयावर व्याख्यान संपन्न

नाशिक | Nashik

नाशिकरोड (Nashik Road) येथील स्वानंद, जेष्ठ नागरिक संघ, शिखरेवाडी येथे अविनाश कुलकर्णी यांचे ‘अवयवदान जागरूकता’ या विषयावर व्याख्यान (Lecture) झाले. यावेळी त्यांनी व्याख्यानात अवयवदानाची गरज (Need for Organ Donation) व त्यातील अडथळे स्पष्ट करून नेत्रदान, त्वचादान, देहदान आणि अवयवदानाबद्दल सविस्तर माहिती दिली…

- Advertisement -

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

यावेळी कुलकर्णी यांनी ब्रेन डेड, कोमा यातील फरक व ग्रीन कॉरिडॉरविषयी माहिती देतांना ZTCC,SOTTO, ROTTO आणि NOTTO च्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी श्रोत्यांनी अविनाश कुलकर्णी यांना विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट

दरम्यान, यावेळी रवींद्र चंद्रात्रे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. तर अध्यक्ष जे.डी. कुलकर्णी यांनी शाल व श्रीफळ देऊन अविनाश कुलकर्णी यांचा सत्कार केला. तसेच पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या