Friday, May 3, 2024
Homeनगरखुनी हल्ला करणार्‍याला दोन महिन्यानंतर बेड्या

खुनी हल्ला करणार्‍याला दोन महिन्यानंतर बेड्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पसार असलेल्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल फिरोज शेख (वय 26 रा.केडगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला केडगाव परिसरातून ताब्यात घेत अटक केली.

- Advertisement -

केडगाव परिसरात 12 जुन 2023 रोजी राहुल प्रल्हाद शेळके (वय 24 रा. केडगाव) यांना दोघांनी धारदार शस्त्राने कानावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा केल्यापासून संशयित आरोपी चांद पठाण, सोहेल शेख हे दोघे पसार झाले होते. यातील सोहेल फिरोज शेख हा केडगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केडगाव भागात सापळा लावून ताब्यात घेत अटक केली आहे.

निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, रवींद्र टकले, मोहन भेटे, नकुल टिपरे, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, दीपक रोहकले यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या