Friday, May 3, 2024
Homeनाशिकअरुण काळे नॉट रिचेबल! बंद घराला नोटीस चिटकवत 'या' तारखेला खातेनिहाय चौकशीला...

अरुण काळे नॉट रिचेबल! बंद घराला नोटीस चिटकवत ‘या’ तारखेला खातेनिहाय चौकशीला हजर राहण्याचे आदेश

पंचवटी | प्रतिनिधी

राज्याचे सह सचिव डॉ. सुप्रिय धपाटे यांनी कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी सचिव अरूण काळे यांचेवर बाजार समिती सभापती यांनी निलंबनाची कारवाई करत खातेनिहाय चौकशी लावली होती. जिल्हा उपनिबंधक यांचे आदेशानुसार खाते निहाय चौकशी एक महिन्यात आत पूर्ण होऊ नये यासाठी काळे हे आपले राहते घर व मोबाईल बंद करून बाहेर गेल्यामुळे आरोपपत्र व नोटीस काळे यांच्या घरावर चिटकवली आहे.

- Advertisement -

९ सप्टेंबर रोजी एडवोकेट मनोज नागापुरकर यांच्या नाशिकरोड येथिल कार्यालयात होणार आहे. यास हजर न राहिल्यास एकतर्फी पूर्ण करण्यात येईल असे देखील नोटीस मध्ये म्हटलें आहे.यामुळे काळे यांच्या अडचणी अधिकच वाढ झाल्याची चर्चा रंगली आहे.

नाशिक जिल्हयातील दोनशे शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेली १९८ शेतकऱ्यांची झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत तेथील कार्यरत सचिव अरुण काळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून त्यांच्याकडुन आपल्या मार्फत खुलासा सादर करण्याबाबत सूचित केले होते. काळे यांनी सादर केलेला खुलासा शासन स्तरावरून अमान्य करण्यात आलेला होता.

तसेच माजी संचालक शंकरराव धनवटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तत्कालीन पणनमंत्री यांनी काळे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई बाबत निर्देश दिले होते. शासन आदेशानुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सभापती देविदास पिंगळे यांनी निलंबनाचे व खातेनिहाय चौकशी आदेश दिले होते.

जिल्हा उपनिबंधक यांनी केलेल्या आदेशानुसार खातेनिहाय चौकशी एक महिन्यात आत पूर्ण होऊ नये यासाठी काळे हे राहते घर व मोबाईल बंद करून बाहेर गेल्यामुळे आरोपपत्रांची बजावणी होऊ शकली नाही.बाजार समिती प्रशासनाने १२ पानी आरोपपत्र काळे घरा बाहेरील गेटवर चिटकवून दिले आहे.

चौकशी ही ९ सप्टेंबर रोजी नाशिक रोड येथील पी व्हीं लोखंडे यांच्या कार्यालयात मनोज नागापुरकर यांचे द्वारा होणार आहे, असे देखील नोटीस मध्ये म्हटले आहे. सदर चौकशीस सहकार्य व हजर न राहिल्यास एकतर्फी निर्णय लावण्यात येईल असे देखील नोटीस म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या