Friday, May 3, 2024
Homeनगर3 कोटींचा घोटाळा : चौकशीत सचिव, काही व्यापार्‍यांची नावे पुढे

3 कोटींचा घोटाळा : चौकशीत सचिव, काही व्यापार्‍यांची नावे पुढे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा बाजार समितीत बोगस अनुदान प्रकरणात दोन दिवस विशेष लेखा परिक्षक यांच्या पथकाने कागदपत्रे तपासणी केली, मापाडी यांना तसेच काही व्यापारी यांना चौकशीसाठी बोलावले होते. या घोटाळा प्रकरणात सध्या सह्याचे अधिकार नसलेले सचिव, संबंधित काही व्यापारी यांची नावे समोर आली आहेत. परंतु आता यात नि:पक्षपातीपणे कारवाई होण्याची अपेक्षा सर्व शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मागील खरीप हंगामातील कांदा अनुदानाचे अर्ज घेताना खरोखरच कमी रेट असताना कांदा विक्री करणार्‍या शेतकर्‍यांच्या अर्जा बरोबर 495 पेक्षा अधिक बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी प्रकरणे तयार करण्यात आली. यात काही संबंधित व्यापारी यांनी कांदा पट्टी बनून देऊन आपल्या मर्जीतील लाभार्थी याना ठराविक रक्कम तुम्हाला आणि उरलेली परत आम्हाला आणून देण्याच्या बोलीवर त्या काळात कांदा न विकताच बोगस अर्ज मंजूर करून घेतले.

यात बाजार समितीचे सचिव जबाबदार असल्याने यात संगनमत करून अंदाजे 2 कोटी 98 लाख रूपये अनुदान लाटण्याचा प्रकार चौकशीतूनही पुढे येत आहे. याच काळात सर्वच लाभार्थी यांना पाहिले दहा हजार पर्यंत अनुदान खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे आरोप आणि तक्रार असलेले बोगस लाभार्थी असले तरी त्यांनाही अनुदान रक्कम वर्ग झाली आहे.

सन्मानाची रंगली चर्चा

या प्रकरणाची चौकशी करणारे लेखापरीक्षक अधिकारी त्यांच्या पथकाचा शुक्रवारी बाजार समिती अधिकारी, कर्मचारी यांनी यथोचित सत्कार केला. ज्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्याकडूनच हा सत्कार झाल्याने बाजार समितीत चर्चेला उधान आले आहे. सचिव साहेबांची वरपर्यंत ओळख आल्याने ते यातून बरोबर मार्ग काढतील अशी चर्चा काही व्यापारी व त्यांच्या दिवाणांमध्ये सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या