Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामाकपच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

माकपच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

नाशिक। प्रतिनिधी Nashik

चार दिवसांपासून सुरू असलेल्या माकपच्या ठिय्या आंदोलनातील मागण्यांवर आज १ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चा करण्यात येणार असून त्यावर सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता असल्याने आज आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर जिल्हाधिकारी पारधे, माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित, डॉ. डी. एल. कराड आदींसह आंदोलनातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वन हक्काबद्दलच्या विविध तीन मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून सकारात्मक भूमिका दिसून येत असली तरी 2018 साली विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार तातडीने निर्णय घेऊन लिखित आदेश देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधून शुक्रवारी सायंकाळी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्या बैठकीत लिखित आदेश दिल्यास आंदोलन थांबवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

कांद्याला हमीभाव मिळावा, वनजमिनीचा कायदा 2006 मध्ये संसदेमध्ये मंजूर झाला. त्यातील तरतुदींची अंमलबजावणी करावी, अंंगणवाडी सेविका, आशा सेविकांना किमान वेतन मिळावे यासह 8 ते 10 मागण्यांवर चर्चा केली, मात्र कोणताही ठोंस निर्णय या बैठकीत झाला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या