Friday, May 3, 2024
Homeनगरअकोलेच्या बीडीओंना सक्तीच्या रजेवर पाठवा

अकोलेच्या बीडीओंना सक्तीच्या रजेवर पाठवा

अन्यथा गुरूवारपासून झेडपीत उपोषणाचा सुषमा दराडे यांचा इशारा

अहमदनगर (वार्ताहर) – अकोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रेंगडे यांनी भ्रष्टाचार केला आहे. तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व विस्तार अधिकार्‍यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत गटविकास अधिकारी रेंगडे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी केली. रजेवर न पाठविल्यास गुरुवारपासून जिल्हा परिषदेत बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निखिल ओसवाल यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सदस्य दराडे यांच्यासह विजय तळपाडे, लहू तळपे, जालिंदर तळपाडे, बाळासाहेब तळपाडे, बाबासाहेब भांगरे, प्रकाश तळपाडे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, भ्रष्टाचार झाल्याबाबतचे पुरावे जिल्हा परिषदेला सादर केले आहेत. परंतु सदर प्रकरणाची सखोल व पारदर्शी चौकशी होण्यासाठी रेंगडे यांना पदापासून काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तसे झाले नाही तर चौकशी पारदर्शी होणार नाही. भ्रष्टाचाराचे पुरावे दडपून टाकले जातील. त्यामुळे रेंगडे यांना तात्काळ रजेवर पाठवावे. रेंगडे यांना दोन दिवसाच्या आत रजेवर पाठविण्यात न आल्यास 19 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या