Thursday, May 2, 2024
Homeनगरराहाता पालिका पाणीपुरवठा, वीज व अग्नीशमन विभागाचे टेंडर पाचपट जादा असल्याकारणाने रद्द

राहाता पालिका पाणीपुरवठा, वीज व अग्नीशमन विभागाचे टेंडर पाचपट जादा असल्याकारणाने रद्द

राहाता (तालुका प्रतिनिधी)- इतर नगरपालिकेच्या तुलनेत पाच पटीने जादा असलेले राहाता पालिकेचे पाणी पुरवठा, वीज विभाग व अग्नीशमन विभागाचे एकाच व्यक्तीचे भरलेले तीन टेंडर राहाता पालिकेच्या प्रभारी आयएएस मुख्याधिकारी श्रीमती आसीमा मित्तल यांनी रद्द केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

राहाता पालिकेने पाणी पुरवठा, वीज विभाग व अग्नीशमन विभागाच्या दैनंदिन कामासाठी 8 सप्टेंबर 2019 रोजी ई -निविदा मागविली होती. ही निविदा टेंडर स्वामी सर्व्हीसेस प्रा. लि., या नावाने सर्वात कमी दराची निवीदा म्हणून सभेने स्वीकारली. मात्र स्पर्धेतील इतर दोन निविदा ज्या भरण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

त्या एकाच व्यक्तीच्या म्हणजे तिनही निवीदा एकाच व्यक्तीने भरल्या होत्या. मात्र त्यावेळी याची तपासणी केली गेली नाही. तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना पुढील कार्यवाही करता आली नाही. तसेच या सर्व निविदांची पडताळणी करता आली नाही. या निविदेची पडताळणी केली असता इतर नगरपालिकांच्या तुलनेत वीज, पाणीपुरवठा, व अग्नीशमन विभागाच्या निवीदा या जादा दराच्या असल्याच्या दिसून येत असल्याने सदर निवीदा रद्द करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी यांनी सदर कंपनीला नोटिशीद्वारे कळविले.

राहाता पालिका क वर्ग असून सदर टेंडरचा वर्षाला खर्च काढल्यास ते बजेट 80 लाखापर्यंत गेले. त्यामुळे सदर खर्च हा पालिकेला परवडू शकत नसल्याचे तसेच तिनही कंपन्यांचे मालक एकच असून त्यामुळे हे टेंडर रद्द केले जात असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले.

पालिकेच्या डिझेलसाठी स्मार्ट कार्ड
राहाता पालिकेचा डिझेल व पेट्रोलवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून इतर नगरपालिकांना महिन्याला 30 ते 40 हजार खर्च येतो. राहाता पालिकेचा खर्च एक ते सव्वा लाखांपर्यंत जात असल्याने यासाठी पालिकेने डिझेल व पेट्रोलवर होणार्‍या मोठ्या खर्चाला रोखण्यासाठी स्मार्ट कार्ड काढले असून यावर सर्व नोंदी येणार असून डिझेल व पेट्रोलचा गैरवापर थांबेल, अशी माहिती मुख्याधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या