Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कर्जमाफीची घोषणा; विरोधकांचा सभात्याग

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कर्जमाफीची घोषणा; विरोधकांचा सभात्याग

नागपूर | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी कर्जमाफी करण्याच्या विचारात होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली. दुसरीकडे  ७ /१२ कोरा न केल्याने विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले थकीत दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

ही योजना पारदर्शक असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश विमा कंपन्यांना दिले आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी शासन पुरेशी रक्कम उपलब्ध करून देईल असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या