Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी

सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी

मुंबई – शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. यामध्ये 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा वास्तविक पाहता बरोबर नाही. कारण राज्यात दुष्काळ त्यानंतर नापिकी, महापूर, ओला दुष्काळाने शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीककर्जाची मुदत 30 जून 2020 आहे. त्यामुळं थकबाकी असण्याचा विषयच नव्हता. त्यामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्या पिकांना ना कर्जमाफी मिळाली ना फायदा मिळाला. त्यामुळं त्यांचं नुकसान झालं, बर्बाद झाले ते वंचित राहिले.

- Advertisement -

नेमकी ही कर्जमाफी कुणाला मिळणार हा प्रश्न आहे. याबाबत आकडेवारी तपासावी लागेल. यात किती लाभधारक बसतात. पण नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी जर असेल तर ते शेतकरी या योजनेत बसणारच नाहीत, असेही राजु शेट्टी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या