Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : मराठी स्टारकास्टचा ‘देशदूत’मध्ये ‘धुरळा’

Video : मराठी स्टारकास्टचा ‘देशदूत’मध्ये ‘धुरळा’

नाशिक । प्रतिनिधी

समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित ’धुरळा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज देशदूत कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी धुरळा चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतले अनेक लोकप्रिय कलाकार एकत्रित आल्यामूळे सर्वांच्याच नजरा या चित्रपटाकडे लागून आहेत. हा चित्रपट येत्या 3 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

लोकसभा, विधानसभेची निवडणूक बरी पण खेडेगावातील ग्रामपंचायतीलची निवडणूक बरी नाही असे अनेकदा म्हटले जाते. मोजके मतदार असलेल्या गावात निवडणूका अधिक प्रतिष्ठीत होतात त्यामूळे आनंदीगोपाळच्या यशानंतर समीर विद्वांस यांनी अशा सर्वांच्या मनातल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटात मराठी स्टार कास्ट एकत्र आले आहेत. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, उमेश कामत, अलका कुबल, सोनाली कुलकर्णी, सुलेखा तळवळकर, प्रियदर्शन जाधव या कलाकारांची फौज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

धुरळाचे दिग्दर्शक समीर विद्वांस, आनंदी गोपाळ चॅलेंजिंग वाटतो की, धुरळा यावर बोलताना म्हणाले की, आनंदी गोपाळा आधीची एक पिढी दाखवायची होती म्हणून तो चॅलेंजिंग वाटतो. कारण, धुरळातील पिस्थिती आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील बघतो. सोशल मीडियात वाचतो.

त्यामूळे जे इनपुट माझ्या टीमकडून मला मिळत होते त्यातून शॉट फायनल व्हायचे. कुणी चुकत असेल तर लगेत सांगितले जायचे. तसेच आनंदी गोपाळ उभा करायला अधिक मेहनत कलाकारांनाही घ्यावी लागली आणि दिग्दर्शक म्हणून बारीक बारीक गोष्टी बघायला लागल्या होत्या.

मराठी चित्रपटसृष्टीला 350 पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अलका कुबल या एका राजकारणी घराण्यातील आई दाखविण्यात आल्या आहेत. यामध्ये आक्का असा त्यांची भुमिका आहे. नेहमीच प्रेक्षकांना रडविणार्‍या अलका कुबल आता धुरळा चित्रपटात अनोखी भुमिका साकारत असून भूमिका सर्वांना भावणार यात तिळमात्र शंका नसल्याचे त्यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

अंकुश चौधरी या चित्रपटात दादा नावाची भुमिका करत असून सरपंचाच्या खुर्चीसाठी दादा फिल्डींग लावताना यात दिसून येणार आहे. तसेच सिद्धार्थ जाधव हा सिमेंट शेठ म्हणून भुमिका साकारणार असून राजकारणी घराण्यातला एक मुलगा तो साकारत असून एक वेगळ्या तर्‍हेची कलाकारी सिद्धार्थने यातून केली आहे.

दुसरीकडे सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी यांचीही प्रमुख भुमिका यात आहेत. अमेय वाघ, प्रसाद ओक यांच्याही जरा हटके भुमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटात प्रसाद हे सरपंच पदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिसून येत आहेत. तर अमेय हा याच घरातील मुलगा दाखवला आहे. तो सर्वांचा लाडका असून त्याचा रोमँटीक मुडदेखील या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या