घारगाव (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला शिवारात भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या विहीरीत पडला. ही घटना रविवारी रात्री घडली. बिबट्याला सोमवारी दुपारी वनविभागाचे कर्मचार्यांनी ग्रामस्थांचे मदतीने क्रेनच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडून बाहेर काढत जिवदान दिले.
दरम्यान खोल व पाणी असलेल्या या विहिरीचे कठड्यावर बिबट्या बसला होता. क्रेनच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला व कठड्यावर बसलेला बिबट्या काही वेळात पिंजर्यात जेरबंद झाला. बिबट्याला बाहेर काढत नंतर त्यास चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले. तर बिबट्या एक वर्ष वयाचा नर जातीचा असल्याचे वनपाल रामदास थिटे यांनी सांगितले.