Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकशहरात घरफोडीचे सत्र सुरूच; तीन घटनांत पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; तीन घटनांत पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

नाशिक । प्रतिनिधी

शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून औद्योगिक वसाहतीत हे प्रकार अधिक वाढले आहेत. नुकत्याच या भागात झालेल्या तीन घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळेे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

या प्रकरणी नवीन नाशिकच्या पवननगर भागात राहणारे राम मगन घोडके (रा. भगतसिंग चौक, साईबाबा मंदिराजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, घोडके कुटुंबिय रविवारी (दि. 22) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकड व सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
अशोक जगन्नाथ कुंभार (रा.कालभैरव चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

कुंभार कुटुंबिय 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले दोन हजारांची रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिनेे असा 35 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे व जमादार शिंदे करीत आहेत.

सातपूर येथी श्रध्दानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अरुण पंडितराव पाटील (रा.पंडित बंगला,सुयोग कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील कुटुंबिय दि.10 ते 20 डिसेंबरदरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी 18 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या