Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारजीटीपीच्या प्राचार्यांचा अखेर राजीनामा

जीटीपीच्या प्राचार्यांचा अखेर राजीनामा

जळगाव – 

नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या नियुक्तीला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतरही ते कार्यरत असल्यामुळे विद्यापीठाने नुकतीच त्यांना नोटीस बजावली होती. यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून प्रभारी प्राचार्यपदी डॉ.महेंद्र रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

विद्यापीठ अनुदान आयोगाने 2010 मध्येच प्राचार्यांच्या कालावधी पाच वर्षांचा केला. त्यानंतरही विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा पेक्षा जास्त प्राचार्य कार्यरत होते. या सर्वांना विद्यापीठाने नोटीस बाजवून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाची जाणीव करुन दिली.

त्यामुळे नंदुरबार येथील जी.टी.पी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव यांनी राजीनामा दिला. सन 2011 पासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. पाच वर्षानंतरही त्यांची संबंधीत संस्थेने पुनर्नियुक्ती न केल्याने त्यांना विद्यापीठाने त्यांचा राजीनामा मागवला आहे.

त्यांच्या जागी प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ.महेंद्र रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नियमीत प्राचार्यपदासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या