Friday, May 3, 2024
Homeनाशिकइंदिरा नगर : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरील चोरट्यांचे पलायन

इंदिरा नगर : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरील चोरट्यांचे पलायन

इंदिरानगर | वार्ताहर

चार्वाक चौक परिसरातील महिलेच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सुमारे ४५००० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितु शेळके (वय २५ रा नागनाथ रोहाऊस पांडव नगरी)या बुधवार दि ८ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जॉगिंग ट्रॅक कडून चार्वाक चौकडे येत असताना महिला बँकेसमोर पाठीमागून काळ्या रगाच्या दुचाकीवरून अज्ञात दोन इसम आले त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने शेळके यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची पोत किमत सुमारे तीस हजार व. पाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी किंमत सुमारे पंधरा हजार असा एकुन ४५००० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने ओरबाडून धूम स्टाईल दुचाकीने चार्वाक चौक च्या दिशेने पळ काढला

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या