Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्हा झाला दीडशे वर्षांचा!

नाशिक जिल्हा झाला दीडशे वर्षांचा!

नाशिक । ऐतिहासिक व संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेल्या नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. ब्रिटिश राजवटीत 1869 साली जिल्ह्याची स्थापना झाली होती. 2019 मध्ये त्याला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्हा प्रशासन शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात विविध उपक्रम राबविणार आहे. त्यात जिल्ह्याचा सर्वागिण विकास व प्रगतीचा आलेख नाशिककरांपुढे मांडला जाईल.

राज्यातील महत्वपूर्ण जिल्हा अशी नाशिकची ओळख आहे. अगदी रामायणकाळापासून ते सातवाहन राजवटीचा पाऊलखुणा या ठिकाणी पहायला मिळतात. पुरातन काळात जनस्थान, गुलशनाबाद असा नाशिकचा उल्लेख असल्याचे पहायला मिळते. गोदाकाठी वसलेल्या नाशिकला पौराणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक असा समृध्द वारसा लाभला आहे.

- Advertisement -

महसूल व व्यापारउदीमचे महत्वाचे केंद्र म्हणून दीडशे वर्षापुर्वी ब्रिटिशांनी नाशिक जिल्ह्याची स्थापना केली. जिल्हा निर्मितीला सरलेल्या 2019 यां वर्षात दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत.

आज राज्यातील नाशिक महत्वपूर्ण जिल्हा आहे. कृषी, औदयोगिकीकरण, पर्यटन, साहित्य, क्रीडा, दळणवळण या सर्व क्षेत्रात नाशिक जिल्ह्याने प्रगतीचा दूरचा पल्ला गाठला आहे. जिल्हा निर्मितीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी धुमधडाक्यात साजरे करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्याची सवार्र्गीण विकासाची माहिती देणारा उपक्रम फेब्रुवारी व मार्च महिन्यात राबविण्यात येणार आहे. त्यात जिल्ह्याची ऐतिहासिक व भौगोलिक स्थित्यंतरे, खाद्य संस्कृती, साहित्य व इतर क्षेत्रात विकासाची घेतलेली भरारी आदी विषयांची मांडणी करुन नागरिकांना त्याची माहिती दिली जाणार आहे.

गौरवशाली परंपरा
नाशिक जिल्ह्याला गौरवशाली परंपरा लाभली आहे. पौराणिक व ऐतिहासिक दस्तऐवजात नाशिकचे संदर्भ सापडतात. मागील दीडशे वर्षात जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शतकोत्तर सूवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचे साक्षीदार व माहिती असलेल्यांनी या उपक्रमात हिरारीने सहभागी व्हावे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या