Friday, May 3, 2024
Homeनाशिकमकर संक्रांतीनिमित्त शिवसेना व भाजपचा मैत्री जपण्याचा प्रयत्न

मकर संक्रांतीनिमित्त शिवसेना व भाजपचा मैत्री जपण्याचा प्रयत्न

नवीन नाशिक | वार्ताहर

मकर संक्रांतीनिमित्त सर्व तिळगूळ देत एकमेकांशी गोड गोड बोलण्याचा निर्धार करतात. मागील सर्व मतभेद विसरून झाले गेले गंगेला मिळाले या उद्देशाने मैत्रीतले संबंध पुन्हा एकदा दृढ करण्याचा हा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र राजकीय पटलावर याबाबतीत अजूनही काही अंशी दुरावा असल्याचं दिसून येते. एकेकाळी शिवसेना व भाजपची मैत्री सर्वश्रुत होती ग्रामपंचायतीपासून तर राज्याच्या ठिकाणी देशपातळीवर होते विधानसभेच्या निवडणूकीनंतर दोघांमधील कटूता वाढत गेली व शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीवर आघाडी निर्माण केली.

- Advertisement -

एकेकाळी मैत्रीचे संबंध असलेल्या शिवसेना भाजपा नेत्यांमधील मतभेद मात्र आजही दिसून येत आहेत त्यातच विधानसभेच्या वेळेस मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार आशी घोषणा करणाऱ्या फडणवीस व घोषणेवर उपहासात्मक टीका ठीक ठिकाणीही झाली त्याचाच प्रत्येय प्रभाग 31 मध्ये दिसून येत आहे.

मुरली फाउंडेशनच्यावतीने राजकीय चर्चेचा विषय राहिलेल्या मी पुन्हा …नाही, तर कधीच… नाही येणार. अशा स्वरूपाचे तर त्याला उत्तर म्हणून जय महाराष्ट्र, नाद नाही करायचा अशा आशयाचे वाक्य असलेले पतंग वाटण्यात आले नगरसेवक सुदाम ढेमसे, चेतन चुंबळे, राजाभाऊ नाठे, मंगेश नागरे, रवींद्र धोंडे, नितीन शिंदे, प्रवीण सोनवणे, सचिन चिंचखेडे आदींनी प्रभागात ठिकाणी पतंग वाटून आनंद साजरा केला राज्य पातळीवर निर्माण झालेले आहेत. अद्यापही स्थानिक पातळीवर हे दिसून येत असल्याने व चर्चेचे राहिलेले मी पुन्हा या वाक्याला सेनेकडून टार्गेट करण्यात आले आहे. आकाशात हे पतंगे झेपावतील. त्या एकाच पतंगावर कधीकाळी मैत्रीचे असलेले शिवसेना भाजपाचे चिन्ह एकाच वेळेला उडणार आहेत त्यामुळे प्रभाग 31 मध्ये राजकीय चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या