Monday, May 6, 2024
Homeधुळेधुळ्यात बॅनर वॉर : दोन गटात हाणामारी

धुळ्यात बॅनर वॉर : दोन गटात हाणामारी

धुळे –

शहरातील दत्तमंदिर चौकातील बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात दि. 9 रोजी दुपारी तुफान हाणामारी झाली. त्यात पिस्टलसह कोयता, लाकडी दांडा व लोखंडी रॉडचा सर्रास वापर करण्यात आला. त्यात दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी परस्परविरोधील तक्रारीवरून 29 जणांविरूध्द देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत नरेश कांतीलाल यादव (गवळी) वय 23 रा. नगावबारी चौफुली, धुळे याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्तमंदिर चौकातील बॅनर फाडल्यावरून व मागील भांडणाच्या कारणावरून दि. 9 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हिम हॉटेलजवळ सागर कांबळे, अजय कांबळे रा. नेहरू नगर, लखन लोणारी रा. विटाभट्टी, रिंकु देशमुख रा. बिलाडी रोड, गौरव नरोटे रा. नेहरू चौक, प्रफुल्ल भोई रा. नगावबारी, ऋषीकेश भांडरकर रा. शनि मंदिराजवळ गोंदुर रोड, पप्पु अहिरराव रा. न्हावी कॉलनी, राहुल लोणारी रा. विटाभट्टी, विशंभर गवते रा. स्वराज नगर, राज भामरे रा. मास्तरवाडी, विजय पवार रा. स्वराज नगर व इतर तीन ते चार जण यांनी नरेश यावद याच्या डोक्याला पिस्टल लावली. तसेच सोबतचे मित्र पंकज थोरात, नितीन एकनाथ पाटील, सतिष सातदिवे व विक्की परदेशी यांना शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, कोयता, लोखंडी रॉड व दांड्याने मारहाण करून नरेशकडील सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याची चैन व रोख रक्कम असा एकुण 85 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल जबरीने चोरून नेला. मारहाणीत पकंज थोरात हा जखमी झाला आहे. याप्रकरणी सागर कांबळेसह 16 ते 17 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

तर परस्परविरोधात गौरव रमेश नरोटे (वय 25 रा. नेहरू नगर, मास्तरवाडी, देवपूर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तमंदिर चौकातील बॅनर फाडल्याच्या कारणावरून वसंत गवळी, भास्कर गवळी, नरेश गवळी, साईकिरण यादव, आकाश पानचरे, रोहीत सानप, ऋषभ पाटील, नितीन पाटील, भावेश हाळदे व इतर तीन ते चार जणांनी संगणमत करून वसंत गवळी याने रॉडने गौरव याच्या डोक्यात वार करून जखमी केले. तर भास्कर गवळी याने जातीवाचक शिवीगाळ करून खिशातील दोन ते तीन हजार रूपये जबरीने काढून घेतले. तसेच नरेश गवळी याने गौरव याच्या डोक्याला बंदूक लावून त्यांच्यासह इतरांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यात गौरव नरोटे हा जखमी झाला. याप्रकरणी वरील 13 ते 14 जणांविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपअधिक्षक सचिन हिरे व पोलिस निरीक्षक संजय सानप करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या