Friday, May 3, 2024
Homeजळगावचाळीसगाव : लोंढे ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले कुलूप ; पाण्याची समस्या सुटेपर्यंत कुलूप...

चाळीसगाव : लोंढे ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले कुलूप ; पाण्याची समस्या सुटेपर्यंत कुलूप न उघडण्याचा संकल्प

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील कृष्णापुरी तांडा लोंढे येथे गेल्या अनेक दिवसांपासून इंलेक्ट्रीक डि.पी.खराब झाल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायात व महावितरणाकडे तक्रार करुन देखील काही एक उपयोग होत नसल्यामुळे संतप्त माहिलांनी लोंढे ग्रुप ग्रामपंचायत सोमवार (दि.२) रोजी कुलूप ठोकले.

- Advertisement -

जोपर्यंत पाण्याची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. तसेच दि.७ रोजी पंचायत कायार्यलसमोर उपोषणाची इशार निवेदनातून देण्यात आला आहे. कृष्णापुरी तांडा लोंढे गृप ग्रामंपचातीला पाणी पुरवठा करणार्‍या विहीरीवरील इलेक्ट्रकी डि.पी.गेल्या एक ते दिड महिन्यांपासून खराब झाली आहे.

तसेच संबंधीत डि.पी.चे कोटेशन नसल्यामुळे महावितरणचे कर्मचारी डि.पी. व वायर वारंवार जमा करुन घेवून जातात. त्यामुळे गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून कृष्णापुरी येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. यासंबंधी ग्रामपंचातीकडे ग्रामस्थांकडून वारंवार तोंडी व लेखी स्वरुपाचे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतू देखील ग्रामपंचायत दखल घेत नसल्यामुळे दि.२ रोजी गावातील संतप्त महिलांनी पाण्यासाठी चक्क ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले.

जोपर्यंत पाण्यासाठी स्वतंत्र डि.पी.ची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत कुलूप न उघडण्याची निर्धार महिलासह ग्रामस्थांनी केला आहे. तसेच यासंबंधी निवेदन सुध्दा ग्रामपंचायतील दिली असून यात दि.७ पर्यंत पाण्याची समस्या न सुटल्यास चाळीसगाव येथील पंचायत समिती कार्यालय समोर कृष्णपूरी ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याच इशारा देण्यात आला आहे.

यानिवेदनावर शांताराम पोपट राठोड, रुपसिंग बापु जाधव, उत्तम गणपत पवार, जगन नरसिंग जाधव, भाईदास जाधव, राहुल राठोड, भिमा चव्हाण, कांतीलाल जाधव, रोशन मोतीला राठोड, निवृत्ती चरणदास जाधव, किसन हारसिंग राठोड, नितीन नामदेव पवार, सोनु विश्वनाथ जाधव, योगेश्वर राठोड, राजु श्रावण चव्हाण, अशोक गणेश राठोड आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या