Monday, May 6, 2024
Homeनगरदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सव्वा सात लाखांची फसवणूक

दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सव्वा सात लाखांची फसवणूक

अहमदनगर (प्रतिनिधी) – बारा महिन्यात भागीदार संस्थेमध्ये ठेव ठेवून त्याची दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सव्वा सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 8 फेब्रुवारी 2019 ते 10 एप्रिल 2019 या दरम्यान घडली. याप्रकरणी शुक्रवारी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विकास वसंत कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पांडुरंग वाडगे (रा. रेल्वेस्टेशन, नगर), अनिल काकडे, महावीर आयतावडे (रा. कर्नाटक), रमेश थोरात (रा. भिंगार), परमानंद पवार (रा. औरंगाबाद) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या