Friday, May 3, 2024
Homeनगरटीकटॉक व्हिडिओ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

टीकटॉक व्हिडिओ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

प्रतिबंधात्मक आदेश मोडणार्‍यांवर खटला चालविणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेशामुळे सर्वत्र काही प्रमाणात शुकशुकाट आहे. रविवारच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर काही उपद्रवी युवक-युवती टीक-टॉक व्हिडिओसाठी रस्त्यावर फिरताना आढळत आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी आहेत. रविवारी असे युवक-युवती व्हिडिओ करताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

नगर शहरात दोन दिवसांपासून प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट आहेत. त्यामुळे बर्‍याच भागातील रस्ते निर्जन आहेत. त्याचा फायदा घेऊन काही युवक-युवती रस्त्यावर येवून टीक-टॉकसाठी व्हिडिओ घेत आहेत. उद्या रविवारी (ता. 22) जनता कर्फ्यू होत आहेत. या काळात कोणी युवक-युवती रस्त्यावर व्हिडिओ किंवा विनाकारण चित्रीकरणासाठी बाहेर पडल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे अशा युवक-युवतींनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करून दोषारोपत्र दाखल करण्याच्या सूचना आहेत. आतापर्यंत 74 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होणार आहे. त्यांच्याविरोधात खटला चालविला जाणार आहे. प्रतिबंधात्मक आदेशाच्या तरतुदींतील कलमांनुसार हे गुन्हे सार्वजनिक हितासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे दोष सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन महिने तुरुंगावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते, असे पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले. त्यामुळे जनतेने प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करून जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या