Friday, May 3, 2024
Homeनाशिककळवण येथील देसाई कुटुंबीयांनी अमेरिकेत साजरा केला गुढीपाडवा

कळवण येथील देसाई कुटुंबीयांनी अमेरिकेत साजरा केला गुढीपाडवा

नाशिक : कळवण तालुक्यातील अभोणा येथील रहिवासी प्रा.अशोक एकनाथ देसाई (मूळचे अभोना ता.कळवण) यांचे चिरंजीव स्वप्नील अशोक देसाई हे पत्नी मेघा यांनी अमेरिकेतील न्यूजर्सी या शहरात बुधवारी (दि.२५) गुढी पाडवा उत्साहात साजरा केला.

दरम्यान सद्यस्थितीत कोरोना ने जगभरात थैमान घातलेले आहे. अमेरिकेत सुद्धा मोठया प्रमाणात रूग्ण असल्याने स्वप्नील व मेघा गेल्या १५ दिवसापासून घरातच आहेत. दोघेही आयटी इंजिनीअर असल्याने घरून काम करीत आहेत. अमेरिकेत कोणालाही बाहेर पडू देत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या दाम्पत्यांनी अमेरिकेत राहत्या घरी गढी उभारत मोठ्या उत्साहात मराठी नववर्ष साजरे केले. त्यानंतर त्यांनी भारतीय तसेच महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केले कि, कोरोनापासून बचाव करावयाचा असल्यास किमान ३० दिवस घरात राहणे बंधनकारक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या देशातील व राज्यातील नागरिकांसाठी कोरोना संकट टाळण्यासाठी अतिशय चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांचे पालन करून आपला भारत देश कोरोना मुक्त करावा, असे जाहीर आवाहन केले आहे.

त्याचबरोबर आपले मराठी सण साजरे करून आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन आम्ही परदेशात करीत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूजर्सी येथे गुढी उभारून महाराष्टीयन सण पाडवा उत्साहात साजरा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या