Friday, May 3, 2024
Homeनगरनागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

नागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

अहमदनगर –  नगर शहर व तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन तहसिल कार्यालय अहमदनगर यांचे मार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असुन लॉकडाऊन कालावधीत नागरीकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे. तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरीकांचे सोयीसाठी तहसिल कार्यालय अहमदनगर येथे २४ तास कोरोना कंट्रोलरुम (नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आला असुन याबाबत नागरिकांना काही समस्या असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी  ०२४१-२४११६०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

लॉकडाऊन कालावधीत शहरात व ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा (किराणा दुकान, दुध, फळे, भाजीपाला, औषधांचे दुकान, दवाखाने, कृषीसेवा केंद्र, पेट्रोलपंप, एलपीजी गॅस इ.) सेवा सुरुळीतपणे चालु आहेत. उक्त सेवांचा लाभ घेताना विक्रेते व ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्मस पाळणे आवश्यक आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणे व गर्दी करणे याबाबत पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असुन लॉकडाऊन कालावधीत नागरीकांनी घरी राहणे अनिवार्य आहे. कायदेशीर तरतु्दीचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ व भारतीय साथ रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या