Friday, May 3, 2024
Homeनाशिक२७ चेक पोस्टमधून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी : जिल्हाधिकारी मांढरे

२७ चेक पोस्टमधून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी : जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । जिल्ह्यातील प्रवेशाच्या २७ सीमांवर इतर वाहनांना प्रवेशबंद असून केवळ जीवनाश्यक वस्तू वाहतूक वाहनांनाच प्रवेश दिला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

इगतपुरीत मुंबईतील येणाऱ्या नागरिकांनाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करत तसे पत्रही सचिव स्तरावर धाडले आहे.
कोरोना हा विदेशातून आलेला संसर्ग जन्य आजार आहे.त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच सिमा सील करण्यात आल्या आहेत. कुणालाही प्रवेश आणि बाहेर जाण्यास परवानगी नाही. परंतू मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथील नागरिक जवळच असलेल्या नाशिकमधील इगतपुरीत मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे.

- Advertisement -

हे नाशिकच्या दृष्टीने धोकेदायक असल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्याबाबत बाहेरुन येणाऱ्यांना अजिबात प्रवेश देऊ नये असे आदेशच दिले आहेत. शिवाय सचिव स्तरावरही अशा लोकांना जिल्ह्यास प्रवेशाची परवानगी देऊ नये, असे पत्रही दिले आहेत. कारण जिल्ह्यात संपर्क तपासणी अत्यंत योग्यरितीने केली जात आहे.

एकही कोरोनाग्रस्त जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे त्याची लागन होऊ नये यासाठी बाहेरील लोकांवरच नियंत्रण ठेवणे हाच योग्य उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.

अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हा दाखल –
जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त नसताना एका व्यक्तींना मालेगावात एक रुग्ण असल्याची बातमी पसरवली. ती अत्यंत निरर्थक असल्याने संबधितावर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत प्रसिध्दीशिवाय कुणीही इतर बाबींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मांढरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या