Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedभुसावळ : सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

भुसावळ : सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

भुसावळ  –

कोरोना प्रादुर्भावर टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या दरम्यान दि. 2 रोजी सकाळी शहरातील जाम मोहल्ला भागात मात्र राशन दुकानावर नागरिकांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टंन्सचा फज्जा झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जमावबंदीचे आदेश आहेत. जिवनावश्यक वस्तूंसाठी शहरात सकाळी 7.10 अशी वेळ घालून दिलेली असताना शहरातील जाम मोहल्ला भागातील वसंत माखीजा यांच्या स्वस्त धान्य दुकान नं. दुकान नं.38/1 वर धान्य खरेदीसाठी लाभार्थ्यांची सकाळी 6 वाजेपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

या ठिकाणी शासनाच्या आदेशांचे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. एकिकडे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करत असताना इथे मात्र सर्व नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे स्वस्त धान्याचे दुकान सकाळी लवकर उघडून धान्य वाटप होईल व सकाळी 10 वाजता बंद होईल अशी लोकांमध्ये चर्चा असल्याने व स्थानिक लोकांमध्ये कोरोनाच्या सोशल डिस्टन्सच्या नियमांच्या अज्ञानामुळे सदरील गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या