Friday, May 3, 2024
Homeनाशिकमेणबत्या लावत ‘गो करोना गो’ च्या घोषणेत नवीन नाशकात प्रतिसाद

मेणबत्या लावत ‘गो करोना गो’ च्या घोषणेत नवीन नाशकात प्रतिसाद

नवीन नाशिक : करोना विरोधी लढ्यात एकीचे बळ दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून रात्री ९ वाजता ९ मिनिटा साठी  दिवे मेणबत्त्या पेटविण्याचे आव्हान केले होते त्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळाला.

करोना गो च्या जयजयकारात शुभम पार्क येथिल रहिवाशांनी आपापल्या घराच्या खिडक्या, दरवाज्यात, सज्यात, तसेच बिल्डिंग मधील मोकळ्या जागेत भारताचा नकाशा काढून त्याच्यावर मेणबत्त्या पेटवून, दिवे लावून “कराेना” गो, भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष केला. नऊ वाजे पासून नऊ मिनिटांपर्यंत घरातील दिवे बंद करून, दिवे, मेणबत्त्या लावून रोषणाई केली. महामारी जाण्याच्या घोषणा दिल्या. शंखनाद करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी जणू काही दीपावलीचे स्वरूप आले होते. रस्ते मात्र शुकशुकाट होते नागरिकांनी आपापल्या घराजवळील मोकळ्या जागेत दिवे, मेणबत्ती, मोबाईलचा लाईट लावून दीप प्रज्वलन केले यावेळी राहिवासीयांनी नियमांचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेवून नऊ मिनिटांचे दीपप्रज्वलन केले.

यावेळी बिल्डिंगचे अध्यक्ष सतीश नांदोडे, उपाध्यक्ष निलेश शेलार, सेक्रेटरी जितेंद्र पाटील, खजिनदार अजय बोरसे, चौधरी, रविंद पवार, सचिन गीते, वारे एस के, मीना चौधरी, माधुरी नांदोडे, ज्योती पाटील, साक्षी बोरसे, किशोरी पवार, नीता शेलार, माधुरी वारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या