Thursday, May 9, 2024
Homeनाशिकमालेगावात संशयित रुग्ण तपासणीस विरोध; आरोग्य सेवकांना दमबाजी

मालेगावात संशयित रुग्ण तपासणीस विरोध; आरोग्य सेवकांना दमबाजी

मालेगाव | प्रतिनिधी

करोना विषाणूचा उद्रेक येथे सुरूच असून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सात वर्षीय बालिकेचा अहवाल आज पाँझिटिव्ह आल्याने विषाणू बाधितांची संख्या 30 वर पोहचली. यात एका तरुणीसह इसमाचा मृत्यु देखील झाला आहे. विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेतर्फे घरोघरी सर्वेक्षण सुरू झाले आहे. मात्र, हे सर्वेक्षण एनआर सी व एनटीआर चे केले जात असल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरल्याने आरोग्य सेवकांना दमबाजी व मारहाणीचे प्रकार घडू लागले आहेत.

- Advertisement -

सर्वेक्षणास पथके येताच घराचे दरवाजे लावण्यात येऊन पथकास गल्ली मोहल्ला परिसरात शिरू दिले जात नाही.   सर्वेक्षणास मिळत नसलेल्या प्रतिसादामुळे संशयित रुग्ण शोधायचे कसे या प्रश्नाने प्रशासन यंत्रणेने समोर मोठे संकट उभे ठाकले आहे

दरम्यान, सर्वेक्षणात गैरसमजातून होत असलेल्या विरोधाची गंभीरतेने दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंग, आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मालेगावी धाव घेत कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह स्थानिक आमदार माजी आमदार महापौर आधी लोकप्रतिनिधींसह स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेत सर्वेक्षणास होत असलेल्या विरोधाचा तसेच करोना विषाणू रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

एन आर सी व एनपीएचे सर्व्हेक्षण होत असल्याचा गैरसमज पसरल्यामुळे सर्वेक्षणास विरोध होत असल्याची माहिती पालकमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. याची दखल घेत पालकमंत्री भुजबळ यांनी स्थानिक आमदारांसह लोकप्रतिनिधींना सर्वेक्षण होऊ देण्याबाबत जनतेत जनजागृती करावी. तसेच यासाठी स्वयंसेवकांची मदत देखील घेण्यात यावी अशी विनंती केली.

आपल्या जिवापेक्षा बहुमुल्य असे काहीच नाही गैरसमज न ठेवता पुढे येऊन शहरातील नागरिकांनी वैद्यकीय तपासणी करून घ्याव्यात अशी भावनिक साद पालकमंत्री भुजबळ यांनी या बैठकीत शहरवासीयांना घातलीशहरातील कमल्पुरा गुलाब पार्क मदिना बाद नयापुरा मोमीन पुरा महेवी नगर अपणा सुपर मार्केटहे सात भाग करुणा बाधित रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे.

या भागात नागरिकांना रस्त्यावर येण्यास तसेच बाहेरील नागरिकांना या भागात येण्यास पूर्णता प्रतिबंध घालण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या भागासह संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी सह 400 आरोग्य पथकाद्वारे संशयित रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

मात्र, हे सर्वेक्षण एन आर सी चे आहे असा गैरसमज अफवा द्वारे पसरविण्यात आल्याने आरोग्य पथकातील सेवकांना प्रतिसाद न देण्यास सर्वे करण्यास विरोध केला जात आहे.

गोल्डन नगर भागात तर अशा सेविकेस महिलांनी घरात डांबले तर अंगणवाडी सेविकेच्या पतीस कमालपुरा भागात मारहाणीचा प्रकार घडला. ठिकठिकाणी होत असलेल्या विरोधामुळे भयभीत झालेल्या सर्वेक्षण पथकातील सेवकांनी मनपा आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत सर्वेस होत असलेल्या विरोधाकडे लक्ष वेधले शिवीगाळ व दमबाजीचे प्रकार घडत असल्याने पोलिस बंदोबस्त दिला जावा अशी मागणी सेवकानंतर्फे केली गेली.

मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुक्ती तसेच मौलाना सुखी गुलाम रसूल डॉक्टर सईद फाराणी यांच्यासह कुल जमात तंजीमचे धमँगुरुंनी प्रार्थनास्थळ मिथुन करुणा विषाणू चे संकट दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि आरोग्य तपासणी करून घेण्याचे तसेच सर्वेक्षणास आलेल्या पथकास विरोध न करण्याचे आवाहन केले.

हा सर्वे एन आर सी चा नसून करोना विषाणू रोखणारा असल्याचे पार्थना स्थळांमधून नमाज प्रसंगी धर्म गुरुं तर्फे सांगितले गेले. दरम्यान राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलीस प्रशासन नियंत्रण येणे भूमिका घेण्याचे स्पष्ट निर्देश आज दिले.

करोना विषाणूस मात देण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. यामुळे आपल्यासह कुटुंबीय सुरक्षित राहणार आहे. बहुतांश नागरिक तपासणी करून घेत आहे. पाच-दहा टक्के लोकच गैरसमजातून यास विरोध करत आहे त्यामुळे स्वतः सह शहराच्या हिताकरिता सर्वेक्षणास प्रतिसाद द्यावा असे आवाहन ना भुसे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या