Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : मालेगाव वगळून नाशिक ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता

Video : मालेगाव वगळून नाशिक ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता

सातपूर | प्रतिनिधी 

राज्यातील व्यापार उद्योग क्षेत्राच्या प्रश्नांची जाण केंद्र सरकारला व्हावी या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या समवेत झुम बैठकीत नाशिकच्या रेडझोन बाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याने  नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisement -

भाजप उद्योग आघाडी च्या वतीने संचारबंदी नंतर संपूर्ण देशात उद्योग व व्यापार क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यावर चर्चा करण्याच्या दृष्टीने या बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राज्याच्या जिल्हास्तरावरून उद्योजक प्रतिनिधी व संघटन पदाधिकाऱ्यांनी ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाइन सहभाग घेतला होता. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

नाशिक बाबत निमा च्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नामध्ये नाशिकला रेड झोन मध्ये टाकण्यात आले आहे. प्रत्यक्षात मालेगाव शहराच्या वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे नाशिकला रेड झोनमध्ये मिळत आहे. या झोनिंग मुळे नाशिक वर अन्याय होत असल्याची भावना उद्योग क्षेत्रात आहे.

नाशिक शहर परिसर  व औद्योगिक क्षेत्र परिसरात कोणतीही करोना आजाराबाबत अडचणीची परिस्थिती नाही. त्यामुळे  रेड झोन मधून काढून नाशिकला  ग्रीन झोन किंवा ऑरेंज झोन करण्यात यावे  अशी मागणी  यावेळी उद्योजकांच्या वतीने  शशी जाधव यांच्या द्वारे करण्यात आली.

यावर बोलताना ना नितीन गडकरी यांनी हा प्रश्न समर्पक असल्याचे सांगून नाशिकमध्ये रुग्णांची संख्या अत्यल्प असतानाही मालेगाव मुळे नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये आला असल्याचे मान्य केले. याबाबत विचार करणे गरजेचे असून निमाने यासंदर्भात  थेट आपल्या मंत्रालयाशी पत्रव्यवहार करावा त्यावर मी निश्चितच सकारात्मक भूमिका घेऊन केंद्रीय स्तरावर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे नाशिक शहराला रेड झोन मधून निघण्याची संधी निर्माण झाली आहे. उद्योजक व्यापारी व नागरिकांमध्ये शहरापुरते  संचारबंदी शिथिल होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या