Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील दुसरा रुग्ण होणार कोरोनामुक्त; गोविंदनगरमधील रुग्णाच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह

नाशिक जिल्ह्यातील दुसरा रुग्ण होणार कोरोनामुक्त; गोविंदनगरमधील रुग्णाच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह

नाशिक : प्रतिनिधी

शहरातील गोविंद नगर येथील करोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यामुळे त्याला लवकरच हॉस्पिटलमधून केले जाणार असल्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात लासलगाव पाठोपाठ गोविंद नगर येथील रुग्णालय योग्य उपचारांद्वारे बरे करण्यास आरोग्य विभागाला यश आले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे नाशिकमध्ये देखील २८ मार्चला करोनाने शिरकाव केला होता. निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील एक रुग्ण करोना बाधित आढळून आला.

परंतु १४ दिवसांच्या उपचारानंतर त्याचे दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह अाल्याने तो या आजारातून बरा झाला आहे. त्यामुळे त्याला टाळ्यांच्या गजरात जिल्हा रुग्णालयातुन मुक्त कण्यात आले. काही दिवसांपुर्वी नाशिक शहरातील पहिला करोना बाधित रुग्ण गोविंद नगर परिसरात आढळून आला होता.

रेल्वे कंत्राटाच्या कामासंदर्भात आग्रा येथे गेलेल्या या रुग्णाला करण्याचा संसर्ग झाल्याचे आढळुन आले हाेते. त्यानंतर त्याच्यावर आरोग्य विभागाने तातडीने उपचार सुरू केले होते. १४ दिवसांचे उपचार घेतल्यानंतर या रुग्णाचे पंधराव्या आणि सोळाव्या अशा दोन्ही दिवसांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामुळे शहरातील या रुग्णाने देखील करोना विषाणूच्या संसर्गामुळे मात केल्याचे स्पष्ट झाले असून या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे त्यामुळे या रुग्णाला देखील लवकरच रुग्णालयातून मुक्त केले जाणार अाहे.

जिल्हाधिकार्‍यांकडून अभिनंदन

जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांनी योग्य पद्धतीने उपचार केल्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील दुसरा आणि शहरातील पहिला रुग्ण बरा झाला असून जिल्हाधिकारी मांढरे यांनी पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या