Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकौतुकास्पद : लॉकडाऊनच्या काळात दांपत्याने २१ दिवसात खोदली २५ फुटांची विहीर

कौतुकास्पद : लॉकडाऊनच्या काळात दांपत्याने २१ दिवसात खोदली २५ फुटांची विहीर

मुंबई : सध्या लॉक डाऊन च्या काळात अनेकजण घरबसल्या काहींना काही करण्यात व्यस्त आहे. अशातच वाशीम मधील एका दांपत्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. लॉकडाऊन च्या २१ दिवसांत त्यांनी चक्क विहिर खोदून गावाची तहान भागवली आहे.

वाशीम जिल्ह्यातील एका खेडेगावातील हे दांपत्य असून ते रोजंदारीचे काम करतात. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 3 मे पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. याकाळात अनेक रोजंदारी कामगारांचे काम बंद आहे. अशावेळी घरी बसल्या काय करायचे हा प्रश्न अनेकांच्या समोर असतांना या दांपत्याने इतरांसमोर आदर्श ठेवला आहे .

- Advertisement -

लॉक डाऊन च्या काळात या पती- पत्नीने घराच्या अंगणात विहीर खोदायचे ठरवले, आणि अथक प्रयत्नाच्या नंतर तब्बल २१ दिवसात २५ फुटांची विहीर त्यांनी खोदून तयार केली आहे. विशेष म्हणजे या विहिरीला बरेच पाणी लागल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट असतांना पाणी टंचाई आ वासून उभी आहे. वाशीम जिल्ह्यात उन्हाळ्याच्या मोसमात पाण्याचे संकट उभे ठाकले असताना या विहिरीमुळे मात्र एन उन्हाळा सुरु असताना या पती पत्नीला दिलासा मिळाला आहे.

अशातच गावात सुरु असलेली नळ जल योजना ठप्प झाली असताना आता विहिरीतील पाण्याचा गावकऱ्यांना सुद्धा उपयोग होणार आहे. तेव्हा गावातील प्रत्येक जण या पती- पत्नीचे कौतुक करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या